Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Vasantrao Nivrutti Gite

Back

Name : वसंत निवृत्ती गिते

Constituency : नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ

Party Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, आमदार - नाशिक मध्य

E-mail : yuwakmitramandal@gmail.com

Name वसंत निवृत्ती गिते

Father's Name : कै. निवृत्ती गिते

Motherís Name : कै. कमलाबाई निवृत्ती गिते

Date of Birth: : २८ ऑगस्ट, १९५८

Place of Place: : नाशिक, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. शोभा वसंत गिते

No. of Children : एकूण - ०३, मुले ०२, मुली ०१

Languages Known : मराठी, हिंदी

Education : दहावी

Profession : शेती, जमीन खरेदी विक्री, बांधकाम

Hobby : वाचन, समाजकार्य

Residence Address : कमल निवास, डॉ. भाभानगर, नाशिक ११, मुंबई नाका, महाराष्ट्र

Office Address : आमदार वसंत भाऊ गिते यांचे संपर्क कार्यालय, नाशिक, मुंबई नाका, महाराष्ट्र

Phone No. : +91 9823136140 / 0253 2599861

  राजकीय कारकीर्द

 • १९९२ साली झालेल्या महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरु झाली.
 • १९९७ पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होऊन शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पदी विजयी.
 • २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.
 • गेली १७ वर्षापासून नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरु अाहे.
 • मनपात भूषविलेली पदे - विधी समिती सभापती, आरोग्य समिती सभापती, गट नेते, सभागृह नेता, स्थायी समिती सदस्य व मा. महापौर अशी चढत्या क्रमाने कारकीर्द यशस्वी रित्या पार पाडली.
 • या सर्व कार्याची पावती म्हणून जनतेने १३ ऑक्टोबर २००९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत "भाऊंना" मोठया मताधिक्याने निवडून देऊन विधानसभेवर पाठविले.

  इतर भूषविलेली पदे

 • नामको बँकत चेअरमन, व्हा. चेअरमन पदे भूषवून बँकेच्या विविध प्रगतीमध्ये मोलाची भर टाकली. सहकार क्षेत्रात चाललेल्या अस्थितेच्या काळात बँकेला सुरक्षित अशा स्थितीत ठेवण्यासाठी संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सतत यशस्वी प्रयत्न केले. संचालक म्हणून कार्यरत आहे.
 • दि. महाराष्ट्र को. ऑ. हाऊसिंग फायनान्स कार्पो. लि. मुंबई या संस्थेची मे २००६ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवड झाली. संचालक म्हणून कार्यरत आहे.
 • एन.डी.सी.सी. बँकेच्या २००७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी व संचालक म्हणून कार्यरत.
 • म्हाडा संचालक म्हणून निवड.
 • सदस्य, रेल्वे सल्लागार समिती.
 • अध्यक्ष, त्वायकॉदो असोसिएशन, महाराष्ट्र राज्य (राज्यस्तरीय कराटे असो.)
 • संस्थापक - युवक मित्र मंडळ, मुंबई नाका, नाशिक
 • संस्थापक - भगवती कला व क्रीडा मंडळ, ट्रस्ट, नाशिक
 • संस्थापक - दि महाराष्ट्र भूषण नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक

  वसंत गिते यांचा कार्य अहवाल

  महापौर कारकीर्द

 • नाशिक शहराचा प्रथम नागरिक झाल्यानंतर सर्व प्रथम नाशिक शहरातील आरोग्य जपण्यासाठी "स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक" ही संकल्पना राबविण्यात आली.
 • अत्यावशक सेवा म्हणून सुंदर रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, पथदीप व्यवस्था याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले.
 • बुद्ध स्मारक, दादासाहेब फाळके स्मारक यांसारखे महत्वाचे प्रकल्प उभारण्यात महत्वाचा सहभाग.
 • सिडको विभागासाठी थेट पाईप लाईन योजना, राजे संभाजी क्रीडा संकुल यासाठी प्रयत्न.

  प्रथम पंचवार्षिक निवडणूक १९९२ ते १९९७ - कारकीर्द

 • नाशिक महानगरपालिका पहिल्या निवडणुकीत वॉर्ड क्र. ५५ मधून मोठया मताधिक्याने निवडून येवून नगरसेवक पदाची कारकीर्द सुरु केली.
 • यावेळी डॉ. भाभानगर, नागजी परिसर, पखालरोड, वैद्यनगर, बचत भवन, नागसेनवाडी, गुरुद्वारा रोड, वझरे मळा असा नव्याने नागरी वस्ती झालेला परिसर वॉर्डात समाविष्ट असल्याने या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरी सुविधांचा अभाव होता तसेच सदरच्या भागात शेतीचे क्षेत्र मोठया प्रमाणात होते परंतु शहराचा विकास होत गेल्याने मोठया प्रमाणात नागरी वस्ती स्थापन झाली व त्या मानाने पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्ते पथदीवे अशा अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या परिसरात सर्व प्रथम अत्यावश्यक सुविधांना प्राधान्य देवून पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या तसेच ड्रेनेज लाईन टाकून रस्ते तयार करण्यात आले.
 • गुरुद्वारा रोड येथील बहुतांशी सोसायट्या रस्त्यापासून खालच्या लेवलला असल्याने पावसाळ्यात येथील रस्त्यांवर मोठया प्रमाणात पाणी साचुन परिसरातील  सोसायट्यांमध्ये जात असल्याने या ठिकाणी पावसाळी गटार व ड्रेनेज लाईन टाकून हा प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढण्यात आला.
 • डॉ. भाभानगर, समता नगर, वैद्यनगर येथे उद्यान विकसित करण्यात आले तसेच तरुणांसाठी वैद्यनगर, नागजी परिसर, भाभानगर येथे अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली.
 • वैद्यनगर येथे पोस्ट ऑफिस आवश्यक असल्याने येथील नागरिकांच्या वतीने सतत पाठपुरवठा करून या ठिकाणी पोस्ट ऑफिसला मंजूरी घेऊन पोस्ट ऑफिससाठी जागा उपलब्ध करून दिली.
 • नागजी हॉस्पिटल येथे पोलिस चौकी उभारण्यात आली.
 • महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण करून त्यांना आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले.
 • विद्यार्थांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थांना बक्षीस वाटप केले जाते.

  दुसरी पंचवार्षिक निवडणूक १९९७ ते २००२ - कारकीर्द

 • दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्र. ५८ मधून निवडणूक लढविण्यात आली. यावेळी या वॉर्डात भाभानगर, नागजी परिसर, हिरवे नगर, समता नगर असा परिसर येत असल्याने या ठिकाणी यापूर्वी केलेल्या कामाची पावती म्हणून जनतेने चांगल्या मताधिक्याने निवडून दिले.
 • याच वर्षात नाशिक शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पदाचा बहुमान मिळाला.
 • मुंबई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने येथे सुनियोजित सर्कलची निर्मिती करून सर्वात मोठा हायमास्ट बसविण्यात आल्याने परिसरातील स्वरूपच बदलून गेले.
 • राष्ट्रीय महामार्गाला समांतर दोन्हीं बाजूस असलेल्या रस्त्यांना मुंबई नाका येथील नासर्डी नदीचे दुतर्फा पुल बांधून महामार्गावरील वाहतूक कमी करण्यात आली त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली.
 • त्याचप्रमाणे मुंबई नाका व काठगल्ली या महत्वाच्या रस्त्याचे काम करण्यात येवून नागरिकांसाठी खुला करण्यात आला त्यामुळे द्वारका सर्कल येथील वाहतुकीचा प्रश्न कमी होऊन वाहतुकीचे विभाजन होण्यास मदत मिळाली.
 • कानड नगर येथे अद्यावत अशा प्रशस्त उद्यानाची निर्मिती करून बालगोपाळांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या.
 • नागजी - वडाळा रोडवरील नासर्डी नदीवर असलेल्या छोट्या पुलाची ऊंची वाढवून पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून वडाळा गावातील लोकांचा संपर्क तुटण्यापासून गैरसोय दूर केली.     
 • वॉर्डात विविध ठिकाणी उच्च दर्जा व जास्त प्रकाश देणारे पथदीवे बसविण्यात आले.
 • उद्यान विभागामार्फत जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करण्यात, परिसर हरित करण्यासाठी जनतेला सहभागी केले.
 • वॉर्डातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी डॉ. भाभानगर येथील हिरवे नगर येथे २० लक्ष लीटरची पाण्याची टाकी बांधण्यात येवून ज्या ज्या ठिकाणी लहान व्यासाच्या पाईप लाईन आहे त्या त्या ठिकाणी मोठया व्यासाच्या पाईप लाईन टाकल्यामुळे पाणी थेट शेवटच्या मजल्यापर्यत पोहचविण्यात येऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.
 • डॉ. भाभानगर येथे नाशिक शहरातील ३५०० आसन व्यवस्था असलेले पाहिले, सर्व सुविधायुक्त व अतिभव्य असे दादासाहेब गायकवाड सभागृहाची निर्मिती करून जनतेसाठी खुले करण्यात आले. सर्व सोयीयुक्त रंगमंच, कलाकारांसाठी ड्रेसिंग रूम, ध्वनीक्षेपण व्यवस्था, प्रशस्त पार्किंग, सभागृहाचे दोन्ही बाजूस प्रवेश गेट, जनरेटर व्यवस्था, स्वछता गृह अशा सुविधा पुरविण्यात आलेल्या आहे. जेणे करून नाशिककरांना मेळावे, छोटेखानी सभा, मनोरंजनाचे कार्यक्रम, प्रबोधनात्मक चर्चा सत्रे येथे घेता येतील.

  तिसरी पंचवार्षिक निवडणूक २००२ ते २००७ - कारकीर्द

 • तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड ऐवजी प्रभागाची निर्मिती झाल्याने या ठिकाणी प्रभागामध्ये तीन सदस्य असल्याने प्रभाग क्र. ६३ ची निवडणूक अटी-तटीची होत असताना सर्व साधारण गटातून प्रतिस्पर्धी उमेदवारांची बिनशर्त माघार घेतल्याने बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळाला.
 • प्रभाग रचनेत भाभानगर, नागजी परिसर, वैद्यनगर, काठेगल्ली, टाकळी रोड, नानावली, अमरधाम इतका मोठा परिसर व्यापलेला होता. 
 • प्रभागात तीन सदस्य असल्याने प्रभागातील विकास करण्यासाठी तिघांच्या सहकार्याने पाठपुरवठा करण्यात आला.
 • भाभानगर येथील नाशिक हॉस्पिटल समोरील मनपाचे ओपन स्पेस येथे विद्यार्थांसाठी सर्व सुविधायुक्त प्रभागातील पहिली स्व. कवी आनंद जोर्वेकर अभ्यासिका व स्व. कमलाबाई गिते सार्वजनिक वाचनालय साकरण्यात आले. त्याच प्रमाणे युवक मित्र मंडळ, मुंबई नाका या मंडळाच्या माध्यमातून रुग्णाच्या सेवेसाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण सुसज्ज अशा तीन रुग्णवाहिका नाशिकच्या जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

Photo Gallery


  राज्यस्तरीय कारकीर्द

 • प्रभु रामचंद्राच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या श्री वसंतराव गिते यांना आज सर्व राज्य "भाऊ" या नावाने ओळखतात.
 • कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा राजकीय वसा मिळाला नसतानाही जनमाणसाने त्यांना राजकारणात राज्यपातळीवर नेवून ठेवले. लहानपणापासून समाज कार्याची आवड व असंख्य कार्यकर्त्यांचे मोहळ पाठीशी असल्याने समाजकार्यात हिरारीने भाग घेवून कोणत्याही प्रकारे पदाची किंवा सत्तेची लालसा न ठेवता दिन दुबळ्यांसाठी अहोरात्र काम करण्याची ताकद गिते यांच्याकडे आहे. छोट्या मोठ्या निवेदनांपासून, मोर्चा, धरने, आंदोलने केली मग ती जनतेच्या हितासाठी असो किंवा पक्षासाठी.
 • अशा प्रकारे काम करीत असताना ते शासन दरबारी पोचवून मार्गी लावण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक असल्याने सर्व थरातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नाशिक महापालिकेच्या १९९२ साली झालेल्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक या पदासाठी निवडणूक लढवून प्रचंड मताधिक्याने निवडून आले व आयतागायत गेली १८ वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करीत आहे.
 • १९९७ साली मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नाशिक शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौर पदी विराजमान झाले. महापौर कारकिर्दीत मा. राजसाहेब यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प राबविले. जनसामान्यांच्या आवश्यक गरजांचा विचार करून त्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यावर भर दिला.
 • श्री वसंत गिते यांचे मुंबई नाका येथील संपर्क कार्यालय सकाळी ९ वाजल्यापासून नागरिकांच्या समस्या नागरिक घेऊन येतात व त्या सोडविण्यासाठी ते तत्पर असतात. तक्रार कोणत्याही प्रकारची असो, तक्रारकर्ता गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा जेष्ट असा भेदभाव न ठेवता फक्त त्याची तक्रार, अडचण किंवा गरज काय आहे व ती आपण कशा पद्धतीने तातडीने सोडवू शकतो याकडे लक्ष देऊन त्याचे पूर्ण समाधान होईलच याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. या ठिकाणी फक्त शहरातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात.

 • मा. श्री राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडतेवेळी सर्व प्रथम नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर त्यांचा खंदा समर्थक म्हणून श्री वसंतराव गिते हे त्यांच्या बरोबर गेले व मनसेची पहिली मुहूर्तमेढ नाशिक शहरात रोवली. पक्षाची व्यापती शहराबरोबरच आजूबाजूच्या खेड़ोपाड़ी वाढवून नाशिक जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राचे राजकारणात ठळक अक्षरात उमठले. मा. श्री राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतुन बाहेर पडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र दौरा करुन जनतेचा कौल घेतला व नविन पक्ष स्थापनेची दिशा ठरवली त्यावेळी श्री गिते त्यांचे बरोबर सक्रीय होते त्यानंतर स्वतः वैयक्तिक संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा दौरा करून मा. राजसाहेबांवर झालेल्या अन्याय व त्यांची पुढील वाटचालीची माहिती सर्व कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेला देवून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ज्यावेळी मा. राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करून पहिली अति भव्य जाहिर सभा मुंबई येथील शिवाजी पार्कवर घेतली त्यावेळी श्री गिते यांचे नेतृत्वाखाली सुमारे ५० हजार कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने शिवाजी पार्क येथे दाखल झाले. यात महिलांचा मोठा होता. त्यावेळी मा. राजसाहेबांनी श्री वसंत गिते यांना सन्मानाने व्यासपीठावर बोलावून त्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकली व खऱ्या अर्थाने मुंबई नाका ते शिवतीर्थ असा प्रवास पूर्ण होवून श्री वसंत गिते यांच्या कार्याला सुवर्ण झालर चढली. त्यांचे नाव राज्याच्या राजकारणात चर्चिल जावू लागले. विरोधकांनी त्याचा धसका घेतला तर स्वकीयांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले. अशा प्रकारे सामान्य शेतकरी कुटुंबातील युवक राज्याच्या राजकारणात गेल्याचे साक्षीदार आपण आहोत.
 • मा. राजसाहेबांनी दिलेली जबाबदारी किती चांगल्या प्रकारे पार पाडू याकडे लक्ष दिले. पक्षाचे पदाधिकारी यांना बरोबर घेवून जिल्ह्यात मोठया जोमाने कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करून शहराबरोबरच खेड्यापाड्यांमध्ये मनसेच्या शाखा उघडून पक्षाचे कार्य तळागाळात पोहोचविले.
 • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर मा. राजसाहेबांनी महाराष्ट्रात होवू घातलेल्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करून निवडून आणले. नाशिक शहराची जबाबदारी श्री वसंत गिते यांच्याकडे दिली. श्री वसंत गिते यांनी रात्रीचा दिवस करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर महानगरपालिकेपेक्षा सर्वात जास्त जागा नाशिक महानगरपालिकेत निवडून आणल्याने महाराष्ट्रातील राजकारणात श्री वसंत गिते यांचे नाव झळाळले. त्यानंतर सातत्याने कार्यात आघाडी घेऊन ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये मनसेचे उमेदवार उभे करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून सत्ता स्थापनेत सिंहाचा वाटा घेतला.
 • एकीकडे राजकारणातील आलेख दिवसेंदिवस वाढत असताना राज्याच्या सहकार क्षेत्रात आघाडी घेऊन नामको बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, दि महाराष्ट्र स्टेट को. ऑ. हाऊसिंग फायनान्स कॉर्पो. लि. मुंबई, म्हाडा यांसारख्या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या संस्थामध्ये संचालक म्हणून निवड होऊन त्यांनी तळागाळातील गरजूंना आर्थिक दृष्ट्या आधार देण्याचे काम केलेले आहे. सहकार क्षेत्रात काम करीत असताना सहकारातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर काम करीत असताना संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचवण्यात मदत झाली.
 • या सर्व कार्याची पावती म्हणून जनतेने १३ ऑक्टोबर २००९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत "भाऊंना" मोठया मताधिक्याने निवडून देऊन विधानसभेवर पाठविले आणि भाऊ "आमदार" झाले. जनतेने टाकलेला विश्वास व मा. राजसाहेब ठाकरे यांचे खंबीर नेतृत्व व कुशल मार्गदर्शनाच्या जोरावर यापुढे जनतेची व तळागाळातील दिनदुबळ्याची सेवा सातत्याने सुरु ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य व विस्तार वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील तसेच मा. राजसाहेबांनी व जनतेने टाकलेली जबाबदारी सार्थ करणे हेच यापुढील लक्ष आहे !!!