Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Chhagan Bhujbal

Back

Name : छगन भुजबळ

Constituency : विधान सभा - येवला (नाशिक)

Party Name : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी

Designation : लोक निर्माण मंत्री और विशेष सहायता विभाग

E-mail : Not Available

Name : छगन चंद्रकांत भुजबळ

Date of Birth : १५ ऑक्टोबर १९४७

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. मीना भुजबल

No. of Children : एक मुलगा - पंकज

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : डिप्लोमा इन मैकेनिकल इंजिनियरिंग

Profession : शेती

Residence Address : रामटेक, डॉ. डी. एन. दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई - ४०० ००६.

Phone No. : Ph: 022 - 23631688 / 022 - 23630640

  पदे आणि जबाबदारया

 • शिवसेनेचे आद्य शाखाप्रमुख डोंगरी ते लालबाग - १९६८
 • शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेतील नगर सेवक - १९७३ ते १९९१
 • मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते - १९७३ ते १९८४
 • मुंबईचे महापौर - १९८५ ते ८६ व पुन्हा १९९० ते ९१
 • अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष - १९९१
 • विधानसभेत शिवसेनेचे आमदार - १९८५, १९९०
 • कॉंग्रेसमध्ये प्रवेशानंतर महाराष्ट्राचे महसूल मंत्री - १९९१
 • गृहनिर्माण व झोपड़पट्टी सुधारणा खात्याचे मंत्री
 • विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते (कॉंग्रेस) - १९९६ - १९९९
 • राष्ट्रवादी कोंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष - १० जून १९९९
 • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री - १९९९
 • विधानपरिषदेवर फेरनिवड - २००२
 • येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड - २००४ (सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिकचे पालकमंत्री)
 • महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पुन्हा निवड - डिसेंबर २००८
 • येवला मतदारसंघातून विधानसभेवर फेरनिवड, तिसरयांदा उपमुख्यमंत्रीपद व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद - सप्टेंबर २००९

  महत्वाचे निर्णय

  महापौर करकिर्दीतील ठळक घटना :-

 • महापौरांच्या अधिकृत वाहनांवर 'मेयर ऑफ बॉम्बे' ऐवजी 'मेयर ऑफ मुंबई' असा ध्वज प्रथमच लावला.
 • गेटवे ऑफ इंडिया येथे, भारताच्या प्रवेशद्वारापाशी 'बॉम्बे' ऐवजी 'मुंबई' असे नाव सर्व भाषांत दाखवणारी कोनशीला बसवली.
 • मुंबईच्या रखरखीत व प्रदुषणयुक्त रस्त्यांमध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाने हिरवीगार ट्रैफिक आयलैंड्स उभारली.
 • मुंबई महापालिकेच्या कारभरात मराठीच्या वापराचा आग्रह धरला.
 • सर्वात महत्वाचे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्लोरा फाउंटनच्या जागी जागतिक दर्जाचे आखीव-रेखीव हुतात्मा स्मारक शिल्प उभारले.

  पर्यटनमंत्री (१९९९ ते २००३)

 • अर्थसंकल्पात पर्यटनासाठी असलेली तरतूद दुपटीने वाढविली.
 • खाजगीकरणाच्या माध्यमातून मुंबईतील गिरगाव चौपाटीवर साहसी जलक्रीडा केंद्रे सुरु केले.
 • कोकणात मालवण तारकर्ली पर्यटन केंद्राचा विस्तार केला, नवी विश्रामगृहे बांधली, नौकानयन सुविधा उपलब्ध करुन दिली.
 • महाराष्ट्र पर्यटनाला नवी दिशा देऊन जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे नाव कोरले.
 • संपूर्ण जगाचे आकर्षण ठरलेली 'डेक्कन ओडिसी' ही शाही पर्यटन रेल्वेगाडी भुजबळ यांच्या कारकिर्दीत सुरु झाली.
 • कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सागरीक्षेत्र पर्यटन विकास महामंडळाची निर्मिती केली.
 • काही गिरिस्थानी रोपवे - लोहरज्जुंचे प्रकल्प मंजूर केले.
 • शास्त्रीय व पर्यटनदृष्टया महत्वाच्या अशा लोणार सरोवराच्या परिसराच्या संवर्धनासाठी विशेष लक्ष घातले. तेथे अतिथि निवास, माहिती केंद्रे, सरोवर दर्शन सहली, भोजन सुविधा उपलब्ध करुन दिल्या.
 • गेटवे ऑफ इंडिया, घारापुरी लेणी, महाबळेश्वर व माथेरान या पर्यटन केंद्रांच्या विकासावर विशेष लक्ष दिले.

  गृहमंत्रालयातील कामगिरी (१९९९ ते २००३)

 • पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेऊन 'पर्यटन पोलीस' विभागाची स्थापना.
 • थांबलेली पोलीस भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली.
 • पोलिसांसाठी समयबद्ध पदोन्नतीची पद्धत अंमलात आणली.
 • मुंबईतील खंडणीराज व माफियाराज संपविले.
 • पोलीस अधिकारयांना कारवाईची मोकळीक देऊन संघटीत गुन्हेगारीवर मात केली व  मुंबईतून बाहेर जाणारे उद्योग व व्यवसाय मुंबईतच राहतील अशी खबरदारी घेतली.
 • पोलिसांसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली.
 • सर्वात महत्वाचे म्हणजे कोट्यवधी रुपयांचे बनावट मुद्रांक छापून अर्थव्यवस्थेत गोंधळ माजवू पाहणारया अब्दुल करीम तेलगीच्या मुसक्या आवळल्या व त्याच्यासह त्याच्या टोळीला तुरुंगाची हवा खायला पाठविले.

  सार्वजानिक बांधकाम विभागाचे मंत्री (२००४ ते पुढे)

 • ग्रामीण महाराष्ट्र मुंबईला व राज्याच्या सर्व विभागीय केंद्रांना जोडण्यासाठी राज्यातले महामार्ग चौपदरी व सहापदरी केले.
 • तालुका पातळीवर दर्जेदार रस्ते बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला.
 • मुंबईत बांधकाम भवन साकारले.
 • मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होणारा मुंबई - आग्रा महामार्ग चौपदरी करुन कसारा घाटातील वाहतुक समस्या संपवली.
 • जळगाव - धुळे - नाशिक - मुंबई प्रवास अधिक सुखकर बनवला.
 • सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभावी विकेंद्रीकरण केले आणि महसूल पातळीवर कामांबाबतचे अधिकार दिले.

  शैक्षणिक कार्य

 • माटुंगा मुंबई येथील व्ही. जे. टी. आय. या ख्वातनाम शैक्षणिक संस्थेत शिक्षण.

  सामाजिक कार्य

 • महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करून तिच्या मार्फत महात्मा फुले यांच्या विचारांचा व परंपरेचा पाठपुरावा.
 • उपेक्षित पद-दलित, मागासवर्गीय यांना न्याय मिळवून देण्यासाठी परिषदे मार्फत प्रयत्न.
 • महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज्यांचे विचार आणि आदर्शांचे प्रचार-प्रसार करण्यासाठी समता परिषदचा उपयोग करण्यावर भर.
 • २००५ मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.

  सांस्कृतिक कार्य

 • १९८५ साली "दैवत" आणि १९९० साली "नवरा बायको" या मराठी चित्रपटांची निर्मिती.

  छंद आणि विशेष आवड

 • क्रिकेट, चित्रपट, वाचन आणि प्रवास

  परदेश दौरा

 • १९८६ आणि १९९० : अमेरिका, फ़्रांस, इंग्लंड, जर्मनी, नेदरलैंड, बेल्झियम, स्वीत्झरलॅड आणि रशिया या देशांचा दौरा.
 • ओसाका, जपान येथे १९९१ साली झालेल्या जगातील महापौरांच्या परिषदेत शिष्टमंडळासमवेत सहभाग.
 • ऑक्टोबर २००० मध्ये फ़्रांस, जर्मनी व इंग्लंड या देशांचा दौरा
 • २८ मे २००१ ते १८ जून २००१ या काळात न्यूयार्क, जिनिव्हा, लंडन दौरा.
 • ९ मे ते २४ मे २००२ या कालावधीत दुबई, बहरीन, मस्कत आणि अबुधाबी यांचा करून महाराष्ट्रातील पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न.
 • त्याचप्रमाणे ऑस्ट्रिया, स्वीडन, नोर्वे, स्पेन, हॉगकॉग व थायलंड या देशांचा दौरा.

Photo Gallery


Video Gallery