Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Bhimrao Powar

 

दि. 7 जुलै, 2017 Back

Name : श्री. भिमराव विठ्ठल पोवार

Constituency : प्रभाग क्र. 15, पनवेल महानगरपालिका

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : उपाध्यक्ष – भारतीय जनता पार्टी, खांदा कॉलनी

E-mail : shriomkareshwar1919@gmail.com

Name : श्री. भिमराव विठ्ठल पोवार

Father's Name : श्री बिठ्ठल लक्ष्मण पोवार

Mother’s Name : हैसाबाई विठ्ठल पोवार

Date of Birth : ७ सप्टेंबर, १९७४

Place of Birth : शिरगाव, कोल्हापूर, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. राजश्री भिमराव पोवार

No. of Children : 02

Education : बी. कॉम.

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Profession : रियल इस्टेट एजन्सी / बिल्डर आणि डेव्हलपर्स

Hobby : सामाजिक कार्य करणे, सास्कृतिक कार्यक्रम राबविणे

Residence Address : मारुती सदन, B-106, सेक्टर 10, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.) 410 206

Office Address : श्री ओमकारेश्वर सोसायटी, शॉप नं. 3, प्लॉट नं. 19/20, सेक्टर 10, खांदा कॉलनी, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.)

Phone No. : +91 8080821919

  राजकीय कारकीर्द

 • उपाध्यक्ष – भारतीय जनता पार्टी, खांदा कॉलनी

  इतर पदे

 • मा. शिक्षण मंडळ सदस्य, पनवेल नगरपालिका
 • संस्थापक / अध्यक्ष, श्री ओमकारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था (मर्या.)
 • संस्थापक / अध्यक्ष, श्री ओमकारेश्वर सा. व सा. मंडळ
 • अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था
 • संस्थापक / अध्यक्ष, श्री महालक्ष्मी साई गणेश चेरीटेबल ट्रस्ट

  सामाजिक कार्य... श्री भिमराव विठ्ठल पोवार यांचा कार्यवृतांत...

 • शिर्के वसाहतीमधील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा आणि प्रसंगी संघर्ष सुद्धा केला.
 • सन २००५ मध्ये श्री ओमकारेश्वर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली व त्या माध्यमातून अनेक युवक व जेष्ठ नागरिक यांना संघटीत केले. आदर्श गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक जागर करण्याचे काम केले. सर्व पक्षीय नेतेमंडळींसह समाजाच्या विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींकडून आदर्श गणेशोत्वाचे कौतुक.
 • सेक्टर ११ येथे सार्वजनिक मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरु केले. सलग १२ वर्ष हे वाचनालय अव्याहतपणे सुरु आहे. दररोज शेकडो वाचक याचा लाभ घेत आहेत.
 • भाविकांची आध्यत्मिक गरज भागविण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह ‘महालक्ष्मी साई गणेश’ मंदिराची स्थापना केली. येथे प्रतिवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी, नवरात्रोत्सव आणि रामनवमी निमित्त श्री साईची पालखी प्रदक्षिणा व श्री साई भंडारा असे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात संपन्न होतात. हजारो भाविक यांचा लाभ घेतात.
 • नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रासदांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. स्कुटी, टी. व्ही., फ्रीज, मायक्रोओव्हन, मोबाईल, घड्याळ यासारख्या आकर्षक बक्षिसांबरोबरच मुलांसाठी रालोपयोगी वस्तुरूपी पारितोषिकांची लयलूट येथे होते.
 • सेक्टर १२ येथे मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरु केले. त्यालाही वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
 • जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरु केले तसेच त्यांच्यासाठी मुरुड जंजीरा यासारख्या विविध निसर्गरम्य ठिकाणी सहलींचे मोफत आयोजन ते करतात. आपल्या आयुष्याच्या उत्तरायण काळात एका वेगळ्या आनंदाची अनुभूती मिळत आहे. अशी भावना या जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 • सन २००८ मध्ये खांदा कॉलनीतील विविध शाळांनी केलेल्या जाचक फी वाढी विरोधात प्रखर आंदोलन छेडून केलेली फी वाढ मागे घेण्यास शाळा प्रशासनास भाग पाडले.
 • आघाडी सरकारच्या काळात पेट्रोल-डिजेल दर वाढी विरोधात रेलरोको आंदोलन यशस्वी केले. यावेळी त्यांना अटक ही झाली.
 • एस.ई.झेड. च्या विरोधात स्थानिक व प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी लढा देताना, विविध व्यापक आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला. याबाबत अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत.
 • श्री ओमकारेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून व्यापक सहकारी चळवळींचा पाया घातला. झी टी. व्ही. वरील जय मल्हार मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारे अभिनेते देवदत्त नागे यांच्या शुभहस्ते पतसंस्थेचे उद्घाटन झाले. या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक होतकरू युवकांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य केले. याच ठिकाणी वीज भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना वीज बिल भरणे सुलभ झाले आहे.
 • या पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांसाठी हळदी-कुंकू, पैठणीचे खेळ, मेहंदी स्पर्धा, मुलांसाठी चित्रकला स्पर्धा अशा अनेक विविध कार्यक्रमांचा आनंद खांदा कॉलनी परिसरातील नागरिक घेत असतात.
 • स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्त गरीब व गरजू विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णांना फळे व औषध वाटप तसेच रक्तदान शिबीर व वृक्षारोपण शिबीर असे विविध उपक्रम प्रतिवर्षी ते राबवत असतात.
 • आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे दाखले तसेच पॅनकार्ड, आधारकार्ड शिबीर आयोजित केले.
 • खांदा कॉलनीमध्ये विविध सोसायट्यांचे नामनिर्देशक फलक त्यांच्या सौजन्याने लावण्यात आले. त्यामुळे कमी श्रमात योग्य पत्ता शोधणे नागरिकांना सुलभ झाले आहे.
 • नोकरी व्यवसायानिमित्त खांदा कॉलनी परिसरात स्थायिक झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना संघटीत केले. पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था या संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी येथे येणाऱ्यांना सहाय्य करण्याचे मोलाचे कार्य ही संस्था करते.
 • खांदा कॉलनीतील बौद्धविहाराच्या सुशोभीकरणासाठी मोलाचे सहकार्य केले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होणाऱ्या मिरवणुकीत सक्रीय सहभाग असतो तसेच यावेळी त्यांच्या सौजन्याने पाणी वाटप केले जाते.
 • त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पनवेल तालुक्यातील प्रशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला व स्व. लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील आदर्श लोकसेवक गौरव पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.
 • नागरी सुविधा व सुखसोयी वाढविण्यासाठी, पाणी पुरवठा सुरळीतपणे व्हावा, गटारे बंदिस्त व्हावी,मान्सूनपूर्व नालेसफाई व्यवस्थित व्हावी या कामांसाठी सिडकोकडे सदैव पाठपुरवठा करून ते तडीस नेण्याचे काम सदैव करीत असतात. जीवनसागर सोसायटी, गणेश ओनर्स असोसिएशन तसेच सेक्टर १२ येथील विविध सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी पाठपुरावा करून कार्यवाही घडवून आणली.

Photo Gallery