Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Balasaheb Patil

Back

Name : बाळासाहेब पाटील

Constituency : पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : मा. रायगड जिल्हा अध्यक्ष

E-mail : balasaheb.patil.bjp@gmail.com

Name बाळासाहेब पाटील

Father's Name : ज्ञानदेव पाटील

Mother’s Name : यशोदा पाटील

Date of Birth: : ७ जून, १९५७

Place of Birth: : महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : छाया बाळासाहेब पाटील

No. of Children : एकूण ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बी. ए.

Profession : कॉन्ट्रक्टर

Hobby : वाचन, समाजसेवा, नवीन लोकांना भेटणे त्यांचे विचार ऐकणे इ.

Residence Address : सी / २०५, संघमित्रा सोसायटी, पनवेल, जिल्हा - रायगड ४१०२०६

Office Address : १७, संघमित्रा सोसायटी, प्लॉट नं. १००, गार्डन हॉटेलच्या मागे, ता. पनवेल, जिल्हा - रायगड ४१०२०६

Phone No. : +91 9820083378

  राजकीय कारकीर्द

 • समाजकार्यापासून कामाला सुरवात करून जनतेचे प्रश्न सोडविण्यात कायम तत्पर राहिलो.
 • राजकीय क्षेत्रात समाजकारणासाठी आलो. ८०% समाजकारण व २०% राजकारण हा मुलमंत्र कायम जपला.
 • प्रथम पनवेल शहर भाजपचा उपाध्यक्ष म्हणून सुरवात करून नंतर शहर अध्यक्ष व त्यानंतर रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली व ती यशस्वीपणे पार पाडत आहे.

  बाळासाहेब पाटील यांची राजकीय वाटचाल...

 • पदवीधर असलेल्या बाळासाहेब पाटील यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिकांचे सुपुत्र असल्यामुळे श्री. बाळासाहेब पाटील यांना देशप्रेमाचा वारसा जन्मजातच लाभला आहे. समाजकारण हा तरूण वयापासून बाळासाहेबांचा आवडीचा विषय आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाळासाहेब पुढाकार घेत व त्यासाठी दिवसरात्र झटत. आपला माणूस अशी प्रतिमा बाळासाहेबांनी जनमानसात निर्माण केली. माझ्या देशासाठी मला काहीतरी करायचंय ! माझ्या समाजासाठी मला काहीतरी चागलं काम करायचंच ! या भावनेने प्रभावीपणे समाजकारण करण्यासाठी राजकीय पक्षाचे माध्यम जवळ असलं पाहिजे. या हेतूने बाळासाहेबांनी राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
 • भारतीय जनता पार्टीचा चेहरा ओबीसींचे नेते “गोपीनाथ मुंडे” यांच्यामुळे महाराष्ट्रात बदलत होता. पक्षात आल्या आल्या बहुजन समाजातील बाळासाहेबांवर भाजपाने पनवेल शहर उपाध्यक्षपदांची जबाबदारी सोपविली. उपाध्यक्षपदांवर प्रभावीपणे कार्य केल्यामुळे बाळासाहेबांना अल्पावधितच ऐतिहासिक पनवेल शहराचे अध्यक्षपद भाजपाने बहाल केले. या संधीचा फायदा घेऊन आपलं कर्तृत्व सिध्द करण्यासाठी बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना संघटीत केले आणि पहिल्यांदा पक्षसंघटना मजबुत केली. गोपीनाथ मुंडे यांनी सत्ता परिवर्तनासाठी महाराष्ट्रात काढलेली “संघर्ष यात्रा” पनवेलला आली तेव्हा पनवेल नगर परिषदेच्या “छत्रपती संभाजी महाराज” मैदानावर मोठी सभा झाली. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सभेसाठी लोकांनी केलेली गर्दी पाहून गोपीनाथ मुंडे यांसारखा लोकनेताही भारावून गेला. गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब पाटील यांची पाठ थोपटली आणि बाळासाहेबांना रायगड जिल्हाध्यक्ष करा अशी शिफारस त्यांनी प्रदेश कार्यकारिणीकडे केली. बाळासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या “रायगड जिल्हयाचे” भाजपा “जिल्हाध्यक्ष” झाले.
 • रायगड जिल्हयात शेकापक्ष आणि काँग्रेस या प्रस्थापित मात्तबर राजकीय पक्षांचे प्राबल्य होते. त्यांना आंदोलनांचा आणि राजकीय सत्तेचा असलेला वारसा त्यांची पक्ष संघटना त्यांची ताकद पाहता त्यांच्यासमोर भाजपाची रायगड जिल्ह्यात वाढ करणं हे बाळासाहेबांसमोर एक मोठे आव्हान होते पण हे आव्हान बाळासाहेबांनी स्विकारलं.
 • “मै अकेलाही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गऐ और कॉरवा बढता गयाँ ।

 • एका उर्दू शायरने म्हटल्याप्रमाणे या शेर सारखे जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात आत्मविश्वासाने बाळासाहेब गेले. एक एक कार्यकर्ता हाताशी धरीत पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केला आणि पाहता पाहता भाजपाची ताकद वाढली. आजही बाळासाहेब पक्षातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जातात. कार्यकर्त्यांना धीर देतात. सर्वसामान्य माणसांच्या प्रशासकीय समस्या, कोणत्याही वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठी रात्री-अपरात्री वेळ काळ न बघता धावून जातात. एखाद्याचे काम केले तर त्याचा उपयोग आपल्या राजकारणासाठी कसा करता येईल अशा उद्देशाने काम न करता कर्तव्यभावनेने कामाकडे बाळासाहेब पाहतात असा त्यांचा स्वभावगुण आहे. त्यामुळे त्यांच्यामागे त्यांच्या हितचिंतकांचा मोठा जमाव आहे. आपल्या निरपेक्षवृत्तीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हृदयात बाळासाहेबांनी अढळस्थान निर्माण केले आहे.

  सामजिक कार्य

 • विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यात कायम तत्पर राहिलो.
 • जनतेचे विजेचे प्रश्न, वन खात्याचे प्रश्न, तहसील व प्रांत खात्यातील जनतेचे प्रलंबित प्रश्न, पोलीस प्रशासन तसेच इतर प्रशासकीय प्रश्नांना कायमच वाचा फोडून वेळेप्रसंगी आंदोलनाची आक्रमक भूमिका घेऊन जनतेचे प्रश्न सोडविले.
 • गुणवंत व हुशार विद्यार्थी तसेच शिक्षक, मुख्यध्यापक यांचा सत्कार समारंभाचे आयोजन.
 • स्थानिकांना टोल माफि मिळविण्यासाठी जनआंदोलन उभेकरून ती लढाई अद्यापही सुरूच आहे व स्थानिकांना टोल माफी मिळेपर्यंत ती सुरूच राहील.
 • ऊसर्ली व रीटघर ग्रामस्थांचा वीजेचा जिव्हाळयाचा प्रश्न त्वरीत सोडवला. आवश्यक पुरवठयापेक्षा जास्त क्षमतेचा transformer लावून घेतला व प्रशासनाकडून फार काळापासून प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडविला.
 • कळंबोली विभागातील अनेक सोसायट्यांना हेडसावणारा ड्रेनेज व्यवस्थापने संदर्भातला प्रश्न सिडकोच्या आडमुठी भुमिकेमुळे पेटला होता. बाळासाहेबांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व स्थानिक संघर्ष समितीच्या सहकार्यामुळे कामी वर्षांचा प्रश्न मार्गी लागला.
 • तळेजाएम्. आय्. डी. सी. (MIDC) येथील नावडे फाट्याजवळील रेल्वेलाईनवर ओव्हरहेड ब्रिज नसल्यामुळे सतत ट्रॅफिक जाम असायचे ही समस्या सोडविण्यासाठी श्री. बाळासाहेब पाटील व इतर भा.ज.पा. कार्येकत्यांनी उपोषन केले व आक्रमक पाठपुरावा केल्याने आज तेथे सहा पदरी उड्डाण पुल उभा राहीला असून तेथील ट्रॅफीक समस्या सुटली आहे.
 • जातपडताळणी प्रशासनाच्या गलभन कारभारामुळे विद्यार्थी व जनतेला रांगेत तासनतास उभे राहावे लागत होते व त्यानंतरही दाखला मिळेलचं याची हमी मिळत नव्हती या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी श्री. बाळासाहेब पाटील यांनी कार्यकरर्त्यांसमवेत बेलापूर येतील जातपडताळणी कार्यालयात धडक देऊन प्रशासनाला धारेवर धरले व तयार असलेले 700 दाखले त्वरीत वितरीत करून घेतले त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अतिशय आनंदीत होऊन भा.ज.पा ला शुभेच्छा दिल्या. तसेच हे तातपडताळणीचे काम त्या त्या विभागीय स्थरावर तहसिलदार कार्यालय वा प्रांत कार्यालय या ठिकाणी करण्यात यावे जेणेकरून एकाच ठिकाणी येणारा कामाचा ताण कमी होईल व लवकरात लवकर दाखले मिळतील.
 • रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार अथवा खासदार नसताना, केवळ प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर इतर ठिकाणाच्या आमदार खासदरांचे विकासनिधी पनवेल व रायगड विभागात वापरून करोडो रूपयांची अनेक लोक उपयोगी कामे यशस्वीरित्या पुर्ण केलेली आहेत. संजयजी केळकर, अशेाकराव मोडक, प्रकाशजी जावडेकर, स्वर्गवासी वेद प्रकाशजी गोयल यांच्या विकास निधीतून रस्ते, नळ-जोडणी योजना, स्मशानभुमी नतुनीकरण, रस्त्यांचे काँक्रेटीकरण, व्यायामशाळा, बोअरवेल अशा अनेक कामांचा समावेश आहे.

  इतर पदे

 • चेअरमन - पनवेल अर्बन को. ऑ. बँक.
 • अध्यक्ष - जयहिंद कला-क्रीडा मंडळ.
 • अध्यक्ष - रिक्षा चालक मालक संघटना.

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • जनतेचे कोणतेही ज्वलंत प्रश्न सोडविले जातील.
 • सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार मिळवून दिला जाईल.
 • शाळा, कॉलेज मध्ये येणाऱ्या शैक्षणिक समस्या सोडविल्या जातील.
 • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
 • गरजू लोकांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष भेटून सोडवू शकतो.
 • गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थांच्या कलागुणांना वाव म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन, करियर मार्गदर्शन व्याख्याने, समाज प्रबोधन व्याख्याने आयोजन.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

 • गुणवंत व हुशार विद्यार्थी तसेच शिक्षक, मुख्यध्यापक यांचा सत्कार समारंभाचे आयोजन.
 • मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषधे वाटप शिबिर.
 • गरजू विद्यार्थांना वह्या वाटप.
 • खारघर येथे उभारण्यात येणाऱ्या टोल नाका रद्द करण्यासाठी यशस्वी जनआंदोलन.
 • सर्व थोर समाजसुधारकांच्या जयंत्या साजऱ्या करणे.
 • रायगड जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसताना बाहेरील आमदार व खासदारांचे करोडोंचे निधी वापरून रस्ते, स्मशानभूमी, व्यायामशाळा, पाणी योजना, ड्रेनेज व्यवस्था, बोअरवेल, क्रोंकीटीकरण अशा अनेक प्रकारची कामे केलेली आहेत.

Photo Gallery