Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Arunsheth Jagannath Bhagat

Back

Name : अरुणशेठ जगन्नाथ भगत

Constituency : १८८, पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : अध्यक्ष, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी

E-mail : prashant.t2100@gmail.com

Name : अरुणशेठ जगन्नाथ भगत

Father's Name : जगन्नाथ भगत

Mother’s Name : भीमाबाई ज. भगत

Date of Birth: : १ जून, १९५४

Place of Birth: : शेलघर, ता. पनवेल, जि. रायगड

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : शांताबाई अरुणशेठ भगत

No. of Children : मुलगा - ०१ व मुली - ०३

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : दहावी

Profession : सिव्हील कॉन्ट्रॅक्टर

Hobby : वाचन, प्रवास, क्रिकेट आणि संगीत

Residence Address : मु. शेलघर, पो. गव्हाण, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०६

Office Address : पनवेल भाजपा मध्यवर्ती कार्यालय, अम्पायर प्राईड, रुपाली सिनेमा समोर, पनवेल शहर, ता. पनवेल, जि. रायगड

Phone No. : +91 9930655223, फोन :- 022 27468133

  राजकीय कारकीर्द

 • अध्यक्ष, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी
 • सदस्य, पनवेल पंचायत समिती
 • सदस्य - २००५ ते २०१४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
 • कार्याध्यक्ष - २००४ ते २०१४ पनवेल तालुका काँग्रेस कमिटी
 • चिटणीस - १९९८ ते २००४ पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्ष
 • सरपंच - १९९३ ते १९९८ गव्हाण ग्रामपंचायत

  संघटात्मक क्षेत्र

  क्रियाशील सदस्य, भारतीय जनता पार्टी, पनवेल तालुका

 • पूर्वीच्या संघटनात्मक पदाच्यामुळे लोकसंपर्क दांडगा असल्याकारणाने सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ४० टक्के ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात मिळविण्यात यश.
 • पक्ष कार्यासाठी दररोज किमान १० तास वेळ देत असतो.

  सदस्य - २००५ ते २०१४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

 • सदस्य म्हणून काम करताना पनवेल काँग्रेस कमिटी, पनवेल शहर काँग्रेस कमिटीशी समन्वय साधून संघटात्मक कार्य दृढ केले.

  कार्याध्यक्ष - २००४ ते २०१४ पनवेल तालुका काँग्रेस कमिटी

 • कार्याध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर पनवेल तालुक्यात काँग्रेस पक्षास बळकटी आणण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर साहेब व आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने गाव कमिट्या, पंचायत समिती विभागीय कमिट्या व जिल्हा परिषद विभागीय कमिट्या स्थापन करून समन्वय साधला.
 • शेतकरी कामगार सारख्या बलाढ्य पक्षाच्या उमेदवाराचा पाडाव करून मा. श्री. प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून निवडून देण्यात खारीचा वाटा उचलला.
 • २ जिल्हा परिषद सदस्य, ५ पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यात यश मिळविले.
 • मा. श्री. प्रशांत ठाकूर यांना पनवेल नगर परिषद अध्यक्ष बनविताना पनवेल नगर परिषदेवर सत्ता स्थापन करण्यास मदत केली.

  चिटणीस - १९९८ ते २००४ पनवेल तालुका शेकाप

 • चिटणीस म्हणून कार्य करताना पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

  इतर पदे

 • सभापती - सन १९९९ ते २००१ कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल
 • सदस्य - सन २००१ ते २००६ नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
 • सदस्य व गटनेता - सन २०१२ पासून पंचायत समिती पनवेल
 • अध्यक्ष - जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळ
 • चेअरमन - छत्रपती शिवाजी विद्यालय, गव्हाण
 • सदस्य - रयत शिक्षण संस्था समन्वय समिती
 • अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ संस्था, रायगड जिल्हा
 • सदस्य - पनवेल पंचायत समिती शिक्षण सल्लागार समिती
 • उपाध्यक्ष - सन २००१ ते २०१५ पनवेल को. ऑप. अर्बन बँक
 • अध्यक्ष - आदर्श पतपेढी, पनवेल
 • संचालक - शांतेश्वरी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतपेढी
 • उपाध्यक्ष - श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल
 • अध्यक्ष - माजी विद्यार्थी संघटना गव्हाण विभाग
 • अध्यक्ष - तंटामुक्ती कमिटी गव्हाण

  परदेश दौरे

 • सिंगापूर, मलेशिया, साउथ आफ्रिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, होंग कोंग, चीन- मकाव

  DEVELOPMENT WORKS / केलेली विकास कामे

  सरपंच, गव्हाण ग्रामपंचायत (कालावधी सन १९९३ ते १९९८)

 • सिडकोकडून वेळोवेळी मिळालेल्या अनुदानामुळे ग्रामपंचायत हद्दीतील गावागावात रस्ते, भुयारी गटारे व सुलभ शौचालये बांधली, नळाद्वारे पाणी पुरवठा केला.
 • ग्रामपंचायत कार्यालयात एक खिडकी योजना राबविली.

  सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल (कालावधी सन १९९९ ते २००१)

 • मार्केटयार्ड परिसरात इतरस्त्र बसणाऱ्या व्यापारांसाठी मार्केट यार्डची भव्यदिव्य इमारत बांधली.
 • आर्थिक दृष्ट्या सबळ केले.

  सदस्य, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (कालावधी सन २००१ ते २००६)

 • शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला पुरेपूर मोबदला मिळवून देण्यासाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती व नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यात समन्वय साधला.

  सदस्य व गटनेता, पंचायत समिती पनवेल (कालावधी सन २०१२ पासून...)

 • शासनाकडून मिळणारे अनुदान सर्व पंचायत समितींना सारख्या प्रमाणात घेऊन गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत विकास घडवून आणला.
 • अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसांच्या भरतीत स्थानिकांना न्याय मिळवून दिला.

  शैक्षणिक क्षेत्र

  माजी खासदार श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आदेशानुसार ठिकठिकाणी विद्यालयांची व महाविद्यालयांची स्थापना.

  अध्यक्ष - जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळ

 • या प्रसारक मंडळाचे १ महाविद्यालय, ३ कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विशेष प्रयत्न.

  चेअरमन - छत्रपती शिवाजी विद्यालय, गव्हाण

 • विद्यालयाची अद्यावत नवीन इमारत लोक देणगीतून बांधली त्यामुळे श्री. रामशेठ ठाकूर यांच्या सारख्या दानी व्यक्तीकडून भरघोस मदत घेतली.
 • विद्यार्थांना कॉम्पुटर शिक्षणासाठी कॉम्पुटर उपलब्ध केले.
 • प्रयोगशाळा अद्यावत केली.

  सदस्य - रयत शिक्षण संस्था समन्वय समिती

 • पनवेलमधील रयत शिक्षण संस्थांच्या विद्यालय व महाविद्यालयांमध्ये समन्वय साधने.

  अध्यक्ष

 • महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ संस्था, रायगड जिल्हा

  सदस्य - पनवेल पंचायत समिती शिक्षण सल्लागार समिती

 • ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न...

  सहकार क्षेत्र

  उपाध्यक्ष - पनवेल को. ऑप. अर्बन बँक (कालावधी सन २००१ ते २०१५)

 • डबघाईला गेलेली बँक स्वतःच्या पायावर उभी करू शकले.
 • गरजवंतांना कर्ज देऊन शेअर होल्डर वाढविले.

  अध्यक्ष - आदर्श पतपेढी, पनवेल

 • सर्व लहान मोठ्या उद्योगांना कर्ज देऊन जास्त लोकांना उद्योगासाठी मदत केली त्यामध्ये शेतकऱ्यांना विशेष मदत केली.
 • पतपेढीला आर्थिक दृष्ट्या बळकटी आणली.

  संचालक - शांतेश्वरी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतपेढी

 • परिसरातील महिलांना एकत्र करून पतपेढी स्थापन करून महिलांना संघटीत केले.
 • निरनिराळ्या लघुउद्योगांद्वारे महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्यास मदत.

  सामाजिक क्षेत्र

  उपाध्यक्ष - श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल

 • मा. आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष असलेल्या या मंडळाद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना औषधोपचारासाठी, शिक्षणासाठी मदत, खेळाडूंना आर्थिक मदत केली जाते. त्यामुळेच अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जावू शकली.
 • मोफत औषधोपचार शिबीर, आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत चष्मे वाटप, मोफत शालेय वस्तूंचे वाटप आदी कार्यक्रमांच्या आयोजनात सक्रीय सहभाग.

  अध्यक्ष - माजी विद्यार्थी संघटना, गव्हाण विभाग

 • याद्वारे प्राथमिक शाळेस मदत व माजी विद्यार्थांना एकत्र करून शाळांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला.

  अध्यक्ष - तंटामुक्ती कमिटी, गव्हाण

 • परिसरातील गावकऱ्यांमध्ये एकोपा राहण्यासाठी प्रयत्न केले.
 • गावस्तरावर छोट्या छोट्या केसेस मिटविल्या.

मा. अरुणशेठ भगत यांचे High Resolution Photo Download करण्यासाठी क्लिक करा.

Photo Gallery


Video Gallery


मा. आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! अरुणशेठ भगत